राहुरी वेब प्रतिनिधी,१४ ( शरद पाचारणे )-
प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना शिकायला मिळतात, म्हणून प्रशिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. त्या माध्यमातून नवनवीन संकल्पना आत्मसात करून आपली संस्था अधिकाधिक कशी पुढे नेता येईल याचेही ज्ञान मिळते, असे प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले. साई आदर्श मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर हे संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहामध्ये पार पडले या प्रसंगी कपाळे बोलत होते. पतसंस्था चळवळीतील वाटचाली विषयी मार्गदर्शन करून ते म्हणाले दरवर्षी संस्थेच्या कर्मचारी वर्गास प्रशिक्षण देऊन स्पर्धेच्या युगात टिकणे गरजेचे असते आणि याबाबतीत साई आदर्शने पतसंस्था चळवळीत एक नवा पायंडा पाडला आहे. ठेवीदार व कर्जदार हे आपले दैवत आहे व त्यांना तत्परतेने सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ संगीता कपाळे व्याख्याते नितीन वाणी, प्रशांत खोपटीकर, यांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन लाभले. यावेळी व्याख्याते नितीन वाणी यांनी कर्मचाऱ्यांनी कायम शिकत राहिले पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे त्यातून ग्राहकांना नवीन सुविधा निर्माण करून दयाव्यात. नवनवीन संकल्पना राबवाव्यात व कायम शिकण्याची वृत्ती ठेवावी. व्याख्याते प्रशांत खोपटीकर यांनी साई आदर्श ने थोड्या दिवसात नावलौकिक केला. त्यास चेअरमन शिवाजीराव कपाळे व संचालक मंडळाचे योग्य नियोजन कर्मचाऱ्यांची साथ असल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरास संचालक विष्णुपंत गीते, अविनाश साबरे, पारस नहार, दीपक त्रिभुवन,हर्षद ताथेड , मॅनेजर सचिन खडके व कर्मचारी यांनी शिबिरात उपस्थित राहून लाभ घेतला. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्याकर्मचारी यांना उत्कृष्ट शाखाधिकारी,कॅशियर,क्लार्क,शिपाई पुरस्कार तसेच सर्वाधिक ठेवी नफा व सोनेतारण करणाऱ्या शाखांचा गौरव सोहळा संपन्न झाला..सूत्र संचालन श्रीकांत जाधव यांनी तर आभार विक्रम जाधव यांनी मानले.