राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे ) दि . ११ –
शहराचे सौंदर्य व नागरिकांचे आरोग्य यांचा सुंदर मिलाप म्हणजे राहुरीतील नव्याने उभारण्यात आलेला जॉगिंग ट्रॅक असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले .राहुरी नगर पालिकेने सुमारे तीन कोटी 75 लाख रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिक महिला व मुलांसाठी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करून दिला त्याचे लोकार्पण तसेच अर्थसंकल्पीय तरतुदीतून राहुरी ते राहुरी स्टेशन रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त नायक तहसीलदार बापू तेलोरे होते. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले अत्यंत नयनरम्य शुशोभीकरण लहान मुलांसाठी खेळण्या सेल्फी पॉईंट कारंजे बसण्यासाठी व्यवस्था व्यायाम साहित्य व चालण्यासाठी उत्तम सुविधा असे सुविधायुक्त जॉगिंग ट्रॅकचा पहिला टप्पा पूर्ण झाला दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. आमदार तनपुरे म्हणाले की मी नगराध्यक्ष असताना राहुरी शहराच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण करून दाखविले. जिल्ह्यातील क वर्ग नगरपालिकेच्या हद्दीत अशा प्रकारचा जॉगिंग ट्रॅक नाही पालिका हद्दीत कोट्यावधी रुपयांच्या विकास कामे केली सुधारित पाणीपुरवठा योजना सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटा शहरातील कचरा गोळा करून कंपोस्ट खताची निर्मिती होण्यासाठी स्विमिंग पूलाचे कामाचे हाती घेतलेले काम यासह रस्ते वीज पाणी स्वच्छता आरोग्य यासाठी मोठे काम केले मागील दहा वर्षात तत्कालीन लोकप्रतिनिधींकडून कोणताही निधी मिळाला नाही विधानसभा मतदारसंघातही गेल्या दहा वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अथक प्रयत्न केले मंत्री पदाची संधी अडीच वर्षे मिळाली त्याचा पुरेपूर उपयोग मतदार संघासाठी केला. मूलभूत गरजा कोणत्या आहे त्याचा अभ्यास करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला दररोज पाणीपुरवठा करणारी राहुरी पालिका ही एकमेव आहे तांत्रिक अडचणीमुळे एखाद्या दिवशी पाणी मिळत नाही मात्र उर्वरित वर्षभर पिण्याच्या पाण्याची सुविधा पालिका देत आहे वाढते शहर व वसाहती लक्षात घेऊन सुधारित पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाच्या मार्गाकडे आहे काम करून नागरिकांच्या हितासाठी अहोरात्र काम केले शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशा स्वरूपाचे काम केले निवडणुकी दिलेले आश्वासने पूर्ण केली. गेल्या तीन वर्षापासून पालिकेवर प्रशासक राज आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार घाबरते मिळालेल्या पदाचा सुयोग्य उपयोग करून संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्न केले. राहुरी शहराच्या जवळच शेती व्यवसाय करणारे शेतकरी आहेत त्यांना वीज पुरवठ्याची मोठी अडचण निर्माण झाली होती त्यासाठी जवळपास 20-20 रोहित्रे बसून वीज समस्या मार्गी लावली विकासाची घोडदौड वेगाने करून आमलाग्र बदल दिसत आहे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल मागील निवडणुकीत शहराने भरभरून मतदान रुपी प्रेम व्यक्त केले त्यातून उतराई होण्यासाठी विकासाची गंगा शहरात सर्वत्र नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आगामी निवडणुकीतही असेच प्रेम व्यक्त करावे असे आवाहन केले. विधानसभा मतदारसंघात व पालिका हद्दीत कोणताही दुजाभाव न ठेवता विकासाचा सर्व घटकांना लाभ व्हावा यासाठी काम केले. डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौले यांनी आमदार तनपुरे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती सादर केली विकासाची घोडदौड पाहून शहरातील अनेकांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला याकडे लक्ष वेधले. ह भ प संजय महाराज धोंगडे यांचे भाषण झाले .या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष प्रकाश देठे, नगरसेवक बाळासाहेब उंडे दशरथ पोपळघट, विलास तनपुरे नंदकुमार तनपुरे सूर्यकांत भुजाडी,अनिल कासार संजय साळवे अशोक आहेर शहाजी जाधव, किशोर जाधव, गजानन सातभाई, विजय करपे संदीप सोनवणे, सुरेश म्हसे, जालिंदर ताकटे , दीपक तनपुरे, इंद्रभान पेरणे अयुब शेख, गोरखनाथ खडके गहिनीनाथ पेरणे, आदिसह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.