घोरपडवाडीचे माजी सरपंच सयाजी श्रीराम सह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

राहुरी वेब प्रतिनिधी,१ ( शरद पाचारणे ) –

राहुरी तालुक्यात बहुतांश गावामध्ये युवक वर्ग मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असून घोरपडवाडी येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्तिथीत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला.
घोरपडवाडीचे माजी सरपंच सयाजी श्रीराम, अनिल हापसे, बुवाजी शेंडगे, सावित्रा थोरात, सावळेराम शिंदे, सविता नंदू पारधे, मीना राजेंद्र शेडगे, नानासाहेब करमड, गंगुबाई काळोखे, रेवन्नाथ हापसे , सोसायटीचे चेअरमन बाबुराव जानकू शेंडगे, मारुती श्रीराम, बबन करमड, निलेश गाडे, चांगदेव हापसे, कैलास झावरे, चंद्रभान करमड, अण्णासाहेब शिंदे, भिकाजी शिंदे, मारुती करमड, ठाकाजी हापसे, म्हाळू हापसे, तानाजी करमड,चंद्रभान करमड, ओंकार शिंदे, अण्णासाहेब येळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये युवक मोठ्या संख्येने भाजपामध्ये पक्ष प्रवेश करत असून आगामी काळात राहुरी विधानसभा मतदारसंघात युवकांच्या भरभक्कम पाठबळावर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर यश मिळणार असून ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांना योग्य मान सन्मान मिळेल अशी खात्री त्यांनी दिली यावेळी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगाने प्रसंगी कार्यकर्त्यांनी सांगितले की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण भाजपामध्ये प्रवेश करत असून आगामी काळात उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, युवा तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, बाबासाहेब शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *