राहुरी वेब प्रतिनिधी,११( शरद पाचारणे ) –
राहुरी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनायांच्या वतीने राहुरी नगर परिषदेसमोर दिनांक ११ सप्टेंबर २०२४ पासून सकाळी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या वतीने राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहुरी सफाई कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत संघटना व संघटनेचे पदाधिकारी यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या बाबत मागणी, सादर केल्या होत्या परंतु सदर कार्यालयाकडून समाधानकारक निर्णय व तोडगा निघत नसल्यामुळे कारणाने ११ सप्टेंबर २०२४ पासून राहुरी नगर परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात सुरू केले आहे सदर कर्मचाऱ्यांच्या खालील प्रमाणे मागण्या आहेत…
१) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेचा लाभ मिळावे
२) पगारातून होणारी डीसीपीएस रक्कम कपाततिचा हिशोब मिळावा
३) सफाई कर्मचारी पदावर असताना सफाईचे काम न करणारे सफाई कामगारांना लाड पागे समितीचा लाभ देण्यात येऊ नये व त्यांच्या सर्विस पुस्तकात नोंद घेण्यात यावी
४) सातवे वेतन आयोगाची फरकाची रक्कम चौथा आणि पाचवा हप्ता पूर्णपणे तात्काळ अदा करण्याबाबत अशा मागण्या आहेत.
या निवेदनावर शैलेश भारस्कर, प्रसाद लाहुंडे ,कुणाल अमृत,कृष्णा वैरागर, अभिषेक गायकवाड ,संतोष वावरे ,सुरेश वावरे ,सागर जगधने, राजेंद्र सरोदे ,जयंत भवरे, निखिलेश वाघ, जितेंद्र चव्हाण, अरुण वावरे ,राजेंद्र सरोदे, किशोर वावरे, सुरेखा साळवे ,मंगल सरोदे, अनिता पवार, शितल गायकवाड, मंदा साळवे, लता धनेधर ,संध्या खंडागळे, लक्ष्मीबाई जगधने, हौसाबाई आढागळे, रूपाली त्रिभुवन, मंगल जगधने ,मनीषा घोरपडे, चित्रलेखा वाव्हळ, छाया बिवाल,गायत्री बिवाल, पूजा बिवाल, नीलू सोलंकी आदींच्या सह्या आहेत