राहुरी वेब प्रतिनिधी,१० ( शरद पाचारणे ) – राहुरी, मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील ५ तर नगर तालुक्यातील १ अशा एकूण ६ कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे व गाव तलाव दुरुस्तीसाठी सुमारे ७८ लक्ष रुपये खर्चाचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
संबंधित बंधाऱ्याची यासाठी वेळोवेळी शासन दुरुस्ती करावी, दरबारी प्रस्ताव सादर केले होते. त्या कामाचा सातत्याने ठेवल्याने शासनाने रुपये निधी दिला असून प्रक्रीया राबवली जाणार प्रक्रीया पूर्ण होताच प्रत्यक्ष पाठपुरावा अखेर ७८ लाख लवकरच निविदा आहे. निविदा कामाला सुरुवात केली जाणार आहे. राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द (१५ लाख), वांबोरी येथील मावल्याचा ओढा (१० लाख) व गाव तलाव दुरुस्ती (१५ लाख), उंबरे येथील साठा बंधारा दुरुस्ती (८ लाख), गुहा येथील गाव तलाव दुरुस्ती (१५ लाख) तर नगर तालुक्यातील परीट मळा, शेंडी साठा बंधारा (१५ लाख) यांचा समावेश आहे. संबंधित कामाला निधी मिळाल्याने दुरुस्ती कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. बंधाऱ्यामुळे व तलावामुळे साठलेल्या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आ. तनपुरे यांनी प्राधान्याने हा प्रश्न सोडविल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत आ. तनपुरे यांचे आभार मानले आहे.