राहुरी वेब प्रतिनिधी,११ ( शरद पाचारणे ) –
राहुरी पोलिसांना गोपनीय बातमी दारावर बातमी मिळाली की मौजे बारागाव नांदूर येथे दोन परप्रांतीय तरुण-तरुणी काही दिवसांपासून राहत आहे सदर ठिकाणी जाऊन तरुण तरुणीला ताब्यात घेतले व सदर बाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचे तरुण हे मध्य प्रदेश राज्यातील रामेंत जी भिंड राज्य मध्य प्रदेश येथील असून सदर बाबत त्यांचे आई-वडील यांनी पोलीस ठाणे मेहोना येथे गु . र. नंबर 85 /2024 बीएनएस 2023 कलम 137/2 अन्वये तक्रार दाखल केलेली आहे. सदर बाबत मध्य प्रदेश पोलीस यांच्याशी संपर्क करून सदर तरुण-तरुणीला ताब्यात घेऊन राहुरी पोलीस स्टेशन येथे आणले व आज रोजी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण औटी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, पोलीस नाईक गणेश सानप,पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट ,सचिन बर्डे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुशाली कुसळकर यांनी केली आहे.