राहुरी वेब प्रतिनिधी,८ ( शरद पाचारणे )-
राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा रविवारी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात महत्वपूर्ण अशा सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या निवेदकांनी असोसिएशन स्थापन करून कार्यकारीणी जाहीर केली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांनी सन्मानित केले. यावेळी शिवसेना आध्यत्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव, युवा उद्योजक ऋषभ लोढा, दत्तात्रय साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी राहुरी फॅक्टरी नाभिक संघटनेचे नूतन अध्यक्ष ऋषि राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अँकर असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब तनपुरे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब ढोकणे, सचिव श्रीकांत जाधव, सल्लागार राजेश मंचरे, संघटक राजेंद्र कोतकर, खजिनदार साईनाथ कदम, सहसंघटक निखिल कराळे , निलेश कराळे, प्रमोद बर्डे, अर्जुन शेटे, सागर भालेराव, प्रतीक जाधव आदी उपस्थित होते.