राहुरी वेब प्रतिनिधी, ८ ( शरद पाचारणे ) –
सालाबाद प्रमाणे यावर्षीही माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार प्राजक तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिनांक 7 सप्टेंबर रविवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार सुनील रासने यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मूर्तीची स्थापना झाली. वेद शास्त्र संपन्न मंत्रोचारात गणेशोत्सवास प्रारंभ झाला. आकर्षक व देखणी मूर्ती लक्षवेधी ठरली. अंतर्गत सजावट करून राहुरी संपर्क कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे आकर्षण ठरू लागले आहे. नित्य नियमाने सकाळी व सायंकाळी आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात येते. यावेळी आमदार तनपुरे यांचे स्वियसहाय्यक संजय कुलकर्णी, प्रकाश शेलार, कार्यालयातील शुभम थोरात, अमोल गुलदगड, शरद तनपुरे, सोमनाथ अनाप, संदीप धनवटे, युवराज तनपुरे ,अक्षय दरंदले, सोमनाथ दरंदले ,प्रमोद ढोकणे आदि उपस्थित होते.