राहुरीच्या ग्लोबल स्कुलला आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान

राहुरी वेब प्रतिनिधी,९( शरद पाचारणे )-
राहुरी येथील नामांकित ग्लोबल स्कूल ला रोटरी क्लब नगरचा आदर्श विद्यालय पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला . शिक्षकांसाठीचा आदर्श विद्या विभूषण पुरस्कारही याच विद्यालयाला मिळाला . पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थी , पालक वर्गातून ग्लोबल स्कूलचे अभिनंदन केले जात आहे .
आहिल्यानगर येथे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर च्या वतीने रोटरी ज्ञान गौरव पुरस्कार सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख उपस्थिती मॅनेजिंग कौन्सिल सदस्या, रयत शिक्षण संस्था सातारा च्या सदस्या श्रीमती मीनाताई माणिकराव जगधने या होत्या, तर कार्यक्रमासाठी माजी सह शिक्षण आयुक्त दिनकर टेमकर , शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक कडूस , शिक्षणाधिकारी (प्राथ.)भास्कर पाटील , शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातुन शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक तसेच रोटरी अहमदनगरचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण जिल्ह्यातील विद्यालय व त्यांचे प्रतिनिधी यांच्या मधून आदर्श विद्यालय व विद्या विभुषण पुरस्कार २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यामध्ये राहुरी येथील नामांकित ग्लोबल स्कुल चा आदर्श विद्यालय पुरस्कार प्राचार्या सौ सारिका रामकिसन ढोकणे यांनी स्वीकारला तर आदर्श शिक्षकांसाठी असलेला विद्या विभुषण पुरस्कार- विद्यालयाच्या शिक्षिका सौ साधना सोमनाथ अनाप यांना मिळाला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे, सचिव श्री. शंकर पाठक तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यालयाचे व मुख्याध्यापिका यांचे अभिनंदन केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून विद्यालय, मुख्याध्यापिका व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *