बोगस दिव्यांगांना आळा बसण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरीषदेस निवेदन

राहुरी वेब प्रतिनिधी ,६ ( शरद पाचारणे )-
देवळाली प्रवरा नगरपरीषद हद्दीतील ज्या दिव्यांगाकडे युनिक आयडी कार्ड किंवा MH बारा अंकी नंबर असणारे ऑनलाइन प्रमाणपत्र नाही आशा दिव्यांगाना 5% निधी देण्यात येऊ नये
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नोंदणीकृत आसलेल्या दिव्यांगाकडे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र MH युडीआयडी नंबर असलेल्याच दिव्यांग प्रमान पञ किंवा युनिक आयडी कार्ड आहे आशाच दिव्यांगास सन 2024 चा 5% निधी देण्यात यावे. ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑफलाइन दिव्यांग प्रमान पञ आहे आशा दिव्यांगाना 5% निधी देण्यात येऊ नये कारण अहमदनगर जिल्हात बोगस दिव्याग प्रमाणपत्राचे प्रमान खूप वाढले आहेत बोगस दिव्यांग प्रमान पञ घेऊन दिव्यांगाच्या योजनाचा फायदा घेत आहे. नगरपालिकेची व शासनाची फसवनुत केली जात आहे या मुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे तसेच या पुढे दिव्यांगाच्या टंक्केवारी नुसार 5% निधी 40% ते59%, .60% ते 79%,आणि 80% ते 100%आसलेल्या दिव्यांगाना तिन टप्यामधे दिव्यांगाच्या टक्केवारीनुसार जो जास्त दिव्यांग असेल त्याला जास्त प्रमाणात पाच टक्के निधी टक्केवारीप्रमाणे देण्यात यावा जेणेकरून जे अस्थीव्यंग,अंध, मतिमंद जास्त प्रमानात दिव्यांगतत्व आहे ते काही काम धंदा करू शकत नाही आशा दिव्यांगस याचा चांगला लाभ मिळेल.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपरीषदेचे मुख्य अधिकारी यांनी मान्य केले आम्ही , ऑफलाइन दिव्यांगाची छाननी करून फक्त युनिक आयडी कार्ड किंवा MH 12 अंक्की नंबर आसलेल्याच दिव्यांगाना 5% निधी चा लाभ दिला जाईल.पुढिल 8 दिवसात दिव्यांगाच्या बॅक खात्यात 5% निधी वर्ग करण्यात येईल आसे आश्वासन दिले. या वेळी निवेदन देताना उत्तर अहमदनगर जिल्हाअध्यक्ष मा.मधुकर घाडगे साहेब , उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष राजेंद्र सोनवने,उपअध्यक्ष केशव जाधव, सचिव सुखदेव किरतने, संपर्क प्रमुख संदिप बोरसे,मनोज संसारे,नवनाथ पिंपळे,रमेश गुलदगड,मारूती सांगळे, कैफ शेख,बाळासाहेब सोनवने,बाबाजान शेख,शाहीद शेख,कमरूनिसा शेख,पंल्वी माळी,मुस्तकिम शेख,गोरक्षनाथ चव्हाण,दत्तात्रय चव्हाण आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *