राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाची परिवर्तन यात्रा सोमवारी राहुरीत धडकणार

राहुरी वेब प्रतिनिधी,६ (शरद पाचा रणे ): –
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मान्यवर वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा काढण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही परिवर्तन यात्रा सोमवारी (दि. ०९) सकाळी १०.०० वाजता राहुरी तालुक्यात धडकणार असल्याची माहिती निमंत्रकांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
याप्रसंगी राहुरी शहरातील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या सभागृहात भव्य सभेचे आयोजन केले असून अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे हे उद्घाटन करणार आहेत. यावेळी गैरसंविधानिक इ.व्ही.एम.च्या माध्यमातून बहुजनांच्या मतांचे मूल्य जात आहे, मराठा समाजाला आरक्षण न देता मराठा व ओबीसी आपसात भांडणे लावणे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करणे, एस.सी-एस.टी.ला असंविधानिक क्रिमीलेअरची घातक अट टाकणे म्हणजे एस.सी-एस.टी.ला आरक्षणापासून दूर करण्याचे षडयंत्र, हिंदू-मुस्लीम यांच्यात धर्माच्या नावावर भांडणे लावणे व निवडणुका जिंकणे हे आर.एस.एस-बी.जे.पी.चे मोठे षडयंत्र आहे. या आणि अशा अनेक विषयांवर या सभेत चर्चा करून मान्यवर वामन मेश्राम हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी राजूभाऊ शेटे, आर.एम.धनवडे, मुश्ताकभाई तांबोळी, भास्कर रणनवरे, इम्रानभाई देशमुख, शिरीष गायकवाड, शिवाजीराव भोसले, राजकुमार आघाव, गणपत मोरे, कांतीलाल जगधने, प्रदीप थोरात, नानाभाऊ जुंधारे, रावसाहेब काळे, राजू साळुंके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर किरण वाघमारे, गौसभाई सय्यद, राम आरगडे, संजय संसारे हे संबोधित करणार आहेत. तरी सदर कार्क्रमासाठी बहुजन समाजातील एस.सी, एस.टी, ओबीसी, भटके विमुक्त, धर्म परावर्तीत, महिला, विद्यार्थी आदींनी उपस्थित राहून तन, मन, धनाने सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *