श्रीरामपूर वेब टीम : शिक्षक दिनाचे औचित्य साधून एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या ३० व्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन नेवासा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांच्याही पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी श्रीरामपूर येथील सोनाली भाग्येश ठाणगे यांना स्टार टीचर्स अवॉर्ड – २०२४ प्रदान करण्यात आला. अबॅकस क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रम प्रसंगी नेवासा तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता ताई गडाख, उपजिल्हाधिकारी विशाल यादव, तहसीलदार रवी सतवन, नायब तहसीलदार किशोर सानप, गटविकास अधिकारी संजय लखपाल, अकॅडमीच्या संचालिका कल्पना घडेकर, अशोक घडेकर, अकॅडमीचे सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या स्पर्धेत एव्हरेस्ट अबॅकस क्लासेस श्रीरामपूर शाखेतील वासिद जावेद सय्यद या विद्यार्थ्याने पाच मिनिटात १८० गुणाकार करून चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. जावेद सय्यद यास श्रीरामपूर, बेलापूर, खंडाळा आणि ऑनलाईन क्लासेसच्या संचालिका सोनाली ठाणगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ठाणगे व सय्यद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.