राहुरी वेब प्रतिनिधी ६( शरद पाचारणे )-
ज्ञानेश्वर सागर भरल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी बारागाव नांदूर ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत धरण भरल्यानंतर एकत्र येत साजरा केलेला आनंदोत्सव प्रेरणादायी ठरल्याचे मत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
बारागाव नांदूर ग्रामस्थांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाडे माजी सरपंच सौ जयश्री गाडे यांनी सपत्नीक मुळा नदी पात्रात जलपूजन केले. त्यानंतर समस्त ग्रामस्थांनी एकत्र येत श्री रोकडेश्वर महाराज मंदिर येथे एकत्र येत धरण भरल्याचा आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती देत मा.खा. तनपुरे यांनी बारागाव नांदूर ग्रामस्थांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणत साजरा केलेला आनंदोत्सव सर्वांसाठी आदर्शवत सांगितले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार यांनी गावातील ज्येष्ट व तरुणांच्या एकीने गावात सलोखा कायम आहे. यापुढील काळातही सर्वांनी एकोपा ठेवत एकतेला पाठबळ देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सरपंच प्रभाकर गाडे, बारागाव नांदूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतेच निवृत्त झालेले ग्रामसेवक गोसावी, पत्रकार रियाज देशमुख, रफिक इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गुळवणी व पुरीचा आस्वाद घेत ग्रामस्थांनी मुळा धरण भरल्याचे समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामस्थांसाठी गुळवणी व पुरीचे जेवणाची पंगत देणारे पत्रकार रियाज देशमुख व रफिक इनामदार यांच्यासह निवृत्त ग्रामसेवक गोसावी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पुढील वर्षी धरण भरल्यानंतर ग्रामस्थांना गुळवणी व पुरीची पंगत देण्याचा नारळ सेवा संस्थेचे अध्यक्ष कैलास गाडे व उपाध्यक्ष राजेंद्र गाडे यांनी घेतला. दोन्ही पदाधिकार्यांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला. संदिप उंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रस्ताविक प्रा. इजाज सय्यद यांनी केले. श्रीराम गाडे, जालिंदर गाडे, वसंत गाडे, बाळासाहेब गाडे, अॅड. पंढू तात्या पवार, माजी सरपंच निवृत्ती देशमुख, नानासाहेब गाडे, सोपान गाडे, बाबाभाई इनामदार, दिलीप कोहकडे, सोमनाथ पवार, हमीदभाई इनामदार, मच्छिंद्र कोहकडे, मच्छिंद्र गाडे, किशोर कोहकडे, योगेश गाडे, सेनेचे बाळासाहेब गाडे, अयुब काकर, सलीम काकर, अनिस इनामदार, बापु मंडलिक, दगडू पवार, सुभाष पवार, आरिफ देशमुख, तमीज पठाण, पपु पटेल, यासिन पिरजादे, सुलतान पठाण, शेखर गाडे, अशोक धनवडे, विजुनाना गाडे, जालुआबा गाडे, लतीफ पटेल, समीर पठाण आदी ग्रामस्थांनी उपस्थिती होती.
मुळा धरण भरताच जपली जाते प्रथा
मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरताच बारागाव नांदूर ग्रामस्थ गुळ पुरवणीची पंगत ठेवत परमेश्वराचे आभार मानतात. स्व. शब्बीर देशमुख यांनी बांधलेले श्री रोकडेश्वर महाराज मंदिर परिसरात उत्सव साजरा करण्याची परंपर अॅड. पंढू पवार व स्व. शब्बीर देशमुख यांनी प्रारंभ केली. ती प्रथा ग्रामस्थांनी जपली.
विकासासाठी कटिबद्ध राहणार
बारागाव नांदूर गावाला जुन्या जाणत्यांनी घालून दिलेली प्रथा आजही ग्रामस्थ जपत आहे. जात,धर्म, पंथ व राजकीय विरहीत सर्वच एकत्र येऊन गावातील उत्सव साजरे करतात. बारागाव नांदूर ग्रामस्थ व राजकीय नेत्यांनी याप्रसंगी एकी कायम ठेवत विकासासाठी सदैव अग्रेसर राहण्याचा संकल्प केला.