शिव प्रतिष्ठान तर्फे सावित्रीबाई फुले विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन

राहुरी वेब प्रतिनिधी,४(शरद पाचारणे )-
शिव प्रतिष्ठान तर्फे आयोजित
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व समुपदेशन
शिव प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबिरामध्ये डॉ प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सर्जन डॉ. गौरी पवार दंतरोग तज्ञ डॉ प्रतीक चौहान, दंत रोग तज्ञ डॉ मयूर पिसे पाटील यांनी विद्यालयातील सुमारे 100 ते 150 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले व पुढील उपचाराची दिशा दिली.
डॉ गौरी पवार यांनी किशोरवयीन मुलींकरता अतिशय प्रबोधनात्मक व्याख्यान देऊन विद्यार्थिनींनी सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच बॅड टच गुड टच याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांची जनजागृती केली.
इयत्ता आठवी ते बारावी च्या मुलींनी विचारलेल्या प्रश्नाला डॉ गौरी यांनी सविस्तर उत्तर देऊन समस्येचे निराकरण केले. विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे यांनी शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव डॉ प्रकाश पवार व शिबिरास उपस्थित सर्व डॉक्टर टिमचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे , प्राध्यापक जितेंद्र मेटकर, सुरेखा आढाव, संतोष जाधव, तुकाराम जाधव, अनघा सासवडकर, सविता गव्हाणे यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *