राहुरी वेब प्रतिनिधी १(शरद पाचारणे ) –
राहुरी येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व विविध सन्मान पात्र गोल्डन ग्रुप सदस्यांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला राहुरी येथील अतिथी हॉल येथे या सत्काराचे आयोजन गोल्डन ग्रुप राहुरी यांच्या वतीने करण्यात आले होते
राहुरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार , पत्रकार प्रसाद मैड यांना आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार व सन्मान मिळाल्याबद्दल तसेच एडवोकेट प्रसाद सांगळे यांनी पोलीस दलातील विधी व न्याय व्यवस्थेचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी शिवशाहीर डॉक्टर विजय महाराज तनपुरे , मच्छिंद्र गुलदगड , युसूफ भाई देशमुख. भारत शेठ भुजाडी , मधुकर येवले , इंजिनिअर ढमाळ साहेब, संदिप हारदे आदी उपस्थित होते .