राहुरी वेब प्रतिनिधी ,१ ( शरद पाचारणे ) –
दिनांक 27. 8. 2024 व 29 . 8. 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन श्री बाळासाहेब आणि सेंट्रल स्कूल या ठिकाणी करण्यात आलेले होते दिनांक 27 रोजी झालेल्या तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल गणेगाव तालुका राहुरी या शाळेने तिन्ही संघांमध्ये वयोगट 14 17 व 19 या मुलांच्या स्पर्धेमध्ये आपला धबधबा कायम ठेवला .श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूलचे मुलांचे वयोगट 14 17 व 19 तिन्ही संघ तालुकास्तरामध्ये प्रथम क्रमांकाचे विजयी मानकरी ठरले. सदर शाळेचे तिन्ही संघाची जिल्हास्तरावर्ती निवड करण्यात आली . त्याचबरोबर दिनांक 30. 8. 2014 रोजी यात शाळेमध्ये मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये देखील श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूलच्या मुलींच्या संघाने आपला नावलौकिक कायम ठेवत विजयी पताका फडकवले. वयोगट 14 व 17 मध्ये दोन्ही संघ तालुक्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले व दोन्ही संघांची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली. विजय संघाचे गटशिक्षणाधिकारी श्री तुंबारे साहेब संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ वाणी सचिव दत्तात्रय वाणी शाळेच्या प्राचार्या सोनिया जोसेफ उपप्राचार्य सागर कडू या सर्वांनी क्रीडा शिक्षक श्री पंकज गायकवाड व विजय टीमचे स्वागत केले त्याचबरोबर त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.