राहुरी वेब प्रतिनिधी,०७ डिसेंबर २५ (शरद पाचारणे) –
प्रेरणा पतसंस्थेने आर्थिक गोष्टीबरोबर अनेक सार्वजनिक उपक्रम घेत असते त्यातील त्यांनी काढलेली दिनदर्शीका हाही एक उपक्रम असून तो महिलांसाठी अतिशय उपयुक्त असून त्याचा त्यांना निश्चितच चांगला फायदा होत असल्याचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सांगितले.
प्रेरणा अर्थ परिवाराचे वतीने दरवर्षी सभासद ग्राहक ठेवीदार हितचिंतक यांचेसाठी अतिशय माहिती असलेली दीनदर्शिका प्रकाशित केली जाते याही वर्षी प्रेरणा पतसंस्थेने काढलेल्या दिनदर्शीकेचे लोकार्पण माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले.प्रेरणा अर्थ परीवार 2026 दिनदर्शिका प्रकाशन मा.खा.प्रसाद तनपुरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी प्रेरणा अर्थ परीवार संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे, प्रेरणा मल्टिस्टेट व्हा.चेअरमन प्रा.वेणुनाथ लांबे, प्रेरणा पतसंस्था व्हा.चेअरमन मच्छिंद्र हुरुळे, प्रेरणा सोसायटी व्हा.चेअरमन अशोक उर्हे, संचालक विष्णुपंत वर्पे, शिवाजी उर्हे, प्रा.विशाल वाबळे, अक्षय ओहळ, गणेश म्हसे सर, प्रेरणा मल्टिस्टेट जनरल मॅनेजर अनिल वर्पे मॅनेजर रविंद्र हिवाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की प्रेरणा पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी दिनदर्शीका काढत असते त्या दिनदर्शीकेचे लोकार्पण माझे हस्ते करण्यात येते. पतसंस्था ह्या एक प्रकारे सावकारकी आहे पण ती वेगळी असून लोकांकडून घेतलेले पैसे गावातील तरुण होतकरू व्यावसायिक उद्योजक यांना व्यवसायासाठी लागणारे भांडवल देण्याचे काम पतसंस्था करीत असतात.प्रेरणा पतसंस्थेने काढलेल्या दीनदर्शीकेतून संस्थेची माहीती समाजापर्यंत पोहचविण्याचे काम या माध्यमातून केले जाते. तसेच या दीनदर्शीकेचा उपयोग घरातील महिला वर्गाला जास्त प्रमाणात होतो सण वार, राष्ट्रीय सण, व महिलासाठी उपयुक्त माहिती या माध्यमातून मिळत असल्याने प्रत्येकाच्या घरात दीनदर्शिका आवर्जून लावण्यात येत असतात. त्या दिनदर्शीकेचे लोकार्पण झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यावेळी म्हणाले की,गेल्या २७ वर्षांपासून प्रेरणा अर्थ परिवाराच्या वतीने दीनदर्शिका काढण्यात येत असते ती याही वर्षी तिन्ही संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आली असून या दिनदर्शीकेच्या माध्यमातून संस्थेचे कार्य घराघरात पोहचविले जाते त्यानिमित्ताने जन संपर्क वाढत जातो. प्रेरणा अर्थ परिवाराने ग्रामीण शहरी भागात चांगल्या प्रकारे काम करताना जी आर्थिक शिस्त पाळली व पारदर्शी कारभार व कोर बँकिंग प्रणालीमुळे दोन्ही संस्थानी २२५ कोटीच्या ठेवीचा टप्पा पार केला.
प्रेरणा अर्थ परिवाराने जी आर्थिक शिस्त पाळली, पारदर्शी कारभार केल्याने ही संस्था नावारूपाला आली असून चालू आर्थिक वर्षात संस्थेने वांबोरी, ब्राम्हणी, देवळाली प्रवरा येथे संस्था सुरु केल्या त्या तिन्ही संस्थांना तेथील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. संस्थेची दीनदर्शिका महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे महिलांच्या दृष्टीने ते एक पंचांगच आहे.आज डिजिटल युग असून काळानूरूप बदल करणे गरजेचे असते म्हणून दरवर्षी दीनदर्शिका काढून समाजासमोर जाण्याचा हा एक प्रयत्न आहे.