राहुरीतून ‘नाथ जागृती’ यात्रेला ११ जानेवारीला प्रारंभ

राहुरी : सकल हिंदू समाज राहुरी तालुक्याच्या वतीने श्रीक्षेत्र श्री बुवा सिद्ध देव मंदिर ते श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड अशी भव्य “नाथ जागृती” यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत रथयात्रा होणार असून, त्यानंतर ११ ते १३ जानेवारीदरम्यान पायी यात्रा संपन्न होणार आहे.

राहुरी शहरातील श्रीक्षेत्र श्री बुवा सिद्ध देव मंदिर येथून यात्रेला प्रारंभ होईल. ही रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनी चौक, पृथ्वी कॉर्नर, शुक्लेश्वर चौक, कानिफनाथ चौक, खंडोबा मंदिर या मार्गे गोरक्षनाथ गड -मांजरसुबा गड- जेऊर येथे मुक्कामी पोहोचणार आहे. त्यानंतर कोल्हार–मिरी येथे मुक्काम, पुढे तिसगाव–मढी मार्गे मच्छिंद्रनाथ गड येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन नाथ जागृती यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन सकल हिंदू समाज राहुरी तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *