राहुरी वेब प्रतिनिधी ,०७ नोव्हेंबर (शरद पाचारणे) – राहुरी तालुका कलाकार मंच आणि केअर संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गाणी, गप्पा आणि बरंच काही – शब्दसुर’ हा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पांडुरंग लॉन्स येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा उद्देश राहुरी तालुक्यातील कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवणे आणि कोणत्याही मुलीचे अपहरण होऊ नये याबाबत जनजागृती करणे हा आहे. स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी शब्दांसह राहुरी तालुका कलाकार मंचाचे कलाकार संगीताच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित करणार आहेत.
कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला आणि मोफत असून, फक्त बैठक व्यवस्थेसाठी ‘बुक माय शो’ ॲपवर निशुल्क नोंदणी करावी, असे आयोजकांनी सांगितले आहे.
फक्त बैठक व्यवस्थेच्या नियोजनासाठी बुक माय शो या ॲपवर निशुल्क नोंदणी करावी .
या कार्यक्रमात ‘ऑपरेशन मुस्कान भाग दोन’ अंतर्गत “खेळ सोशल मीडियाचा – प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा” या विषयावर झालेल्या निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. ही स्पर्धा राहुरी पोलीस स्टेशन, शिक्षण विभाग, राहुरी तालुका कलाकार मंच आणि केअर एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती.