राहुरी फॅक्टरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )२९ सप्टेंबर:
नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव असून देवीची आराधना करतो.यानिमित्ताने स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संकल्प करावा, आज महिला दुचाकीवरून प्रवास करता मात्र हेल्मेट वापरत नाही. हेल्मेट हा केवळ कायद्याचा नियम नाही, तर तो जीव वाचवणारा कवच आहे, असे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने सन्मान नवदुर्गांचा सोहळा सोमवारी पार पडला.प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ.तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे,राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, देवळाली नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ज्योती त्रिभुवन,उद्योजक प्रशांत मुसमाडे, शितल तळपे, लीना परदेशी,डॉ.अनंतकुमार शेकोकार, प्रा.बाळासाहेब शिरस्कर, मच्छिंद्र गागरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अनंता जोशी म्हणाले की, आजच्या काळात महिला सर्व क्षेत्रात पुढे जात आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजकारण – सर्वत्र महिलांची लक्षणीय प्रगती दिसते. प्रवासासाठी अनेक महिला दुचाकीवरून बाहेर पडतात. पण दुर्दैवाने अजूनही मोठ्या प्रमाणावर महिला हेल्मेट वापरत नाहीत हे अत्यंत घातक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी परिवहन विभागाच्यावतीने नवरात्र उत्सवनिमित्ताने महिलांत सुरक्षितेविषयी जनजागृती व्हावी यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम गुरुदेव विमा केंद्राचे गणेश मोढवे, कस्तुरी मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे योगेश निकम, वैष्णवी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे सतीश चोथे, लोकसेवा विमा केंद्राचे सचिन निमसे आदिंसह परिवहन विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील होते.
यावेळी विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद महाविद्यालय नर्सिंग महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी आदी उपस्थित होते.