३१ मार्चपर्यंतची थकबाकी व उर्वरित शास्ती तात्काळ भरा – डॉ. उषाताई तनपुरे यांचे नागरिकांना आवाहन

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) १६ सप्टेंबर :
राहुरी नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या मालमत्तेवर जी २ टक्के शास्ती लावली होती ती शासनाने तत्कालीन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे ५० टक्के माफ करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा लाभ शहरातील नागरिकांनी घेऊन आपली घरपट्टीची ३१/३/२०२५ अखेरची थकबाकी व त्यावरील ५० टक्के शास्तीसह रक्कम भरून राहुरी नगर परिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे यांनी नागरिकांना केले आहे.     माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे यावेळी बोलताना म्हणाल्या की, शासनाने राहुरी नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या थकीत मालमत्तेवर जी २ टक्के शास्ती लावली होती. शासनाने १००टक्के ऐवजी ५० टक्के शास्ती माफ केल्याचे पत्र राहुरी नगर परिषदेस २८/८/२०२५ रोजी प्राप्त झाले असून सदर थकीत घरपट्टी ३१/३/२०२५ पर्यंतची व त्यावरील ५० टक्के शास्तीसह अशी मिळून होणारी रक्कम नागरिकांनी भरण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने त्यास प्रसिद्धी देण्यासाठी प्रभाग वाईज फ्लेक्स बोर्ड, परिषदेच्या भोंग्यावरून त्याबाबतची माहिती द्यावी तसेच शहरात रोज फिरणाऱ्या घंटा गाडी वरूनही थकीत घरपट्टी व ५०टक्के शास्तीसह भरण्याबाबतचे आवाहन करण्यात यावे डॉ सौ तनपुरे यांनी नागरिकांनाही थकीत रक्कम ५०टक्के शास्तीसह भरण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *