राहुरी (प्रतिनिधी) – नामदेव समाजोन्नती परिषदेच्या (नासप) पदाधिकाऱ्यांचा जिल्हा दौरा व समाज बांधवांबरोबर बैठक राहुरी येथे उत्साहात पार पडली. शनिवारी (दि. १३ सप्टेंबर २०२५) सायंकाळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर, मठ गल्ली येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस नासप अध्यक्ष श्री. संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे, सचिव श्री. प्रविण शित्रे, पुणे विभागाचे उपाध्यक्ष श्री. रणजीत माळवदे, संपर्क प्रमुख महाराष्ट्र श्री. महेश मांढरे, जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर श्री. शैलेश धोकटे व श्री. संजय वैद्य हे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी समाज बांधवांनी पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रस्ताविकेत श्री. महेश मांढरे यांनी परिषदेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. अजय फुटाणे यांनी नासपचा इतिहास, उद्दिष्टे, संघटनात्मक कार्य व शासनाच्या योजनांचा समाजाला मिळणारा लाभ यावर मार्गदर्शन केले. त्यांनी शिंपी समाजाची संपूर्ण भारतातील लोकसंख्या तब्बल पाच कोटी असल्याचे सांगून संघटितपणाचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर अध्यक्ष श्री. संजय नेवासकर यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती दिली तसेच १८ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय अधिवेशनाबद्दल सविस्तर माहिती देत सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. नागपूर अधिवेशनास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजातील विविध अडचणी परिषदेच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीस राहुरी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसाद मनोहर नांगरे, धनंजय धोंगडे, सुदेश सुबंध, सुनील धोंगडे, ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, चंद्रशेखर धोंगडे, संजय ढवळे, तारक नेवासकर, सोपान धोंगडे, ऋषिकेश धोंगडे, ॲड. पल्लवी कांबळे आदी मान्यवर सहभागी झाले.
बैठकीनंतर राहुरी तालुक्यातील नामदेव समाजोन्नती परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .
अध्यक्ष श्री. प्रसाद मनोहर नांगरे,उपाध्यक्ष श्री. सोपान चंद्रकांत धोंगडे,सचिव श्री. धनंजय सुभाषचंद्र धोंगडे,समन्वयक ॲड. पल्लवी कांबळे,संघटक ,श्री. तारक राजेंद्र नेवासकर,सदस्य श्री. चंद्रशेखर धोंगडे, कु. ऋषिकेश ढवळे, श्री. ऋषिकेश धोंगडे, श्री. सुदेश सुबंध.
नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करत सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. बैठक अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शेवटी सचिव श्री. धनंजय धोंगडे यांनी आभार मानले.