राहुरी वेब प्रतिनिधी(शरद पाचारणे )१३ सप्टेबर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी योग्य समन्वय ठेवून प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित शाळेची प्रगती होते. ग्रामस्थांनी देखील शाळेच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास गावाचा नावलौकिक वाढतो, असे मत हभप भगवान महाराज मोरे (देहूकर) यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी येथे बदली झालेले शिक्षक सौ. उज्वला खेडकर, प्रभुजी बाचकर, सौ. कल्याणी खराडे यांचा निरोप समारंभ व नव्याने हजर झालेल्या मुख्याध्यापिका संगीता बेदरे व शिक्षक रमेश घोडके यांचा स्वागत सोहळा पार पडला. तसेच सौ. रोहिणी खडके यांची अंगणवाडी मदतनीस म्हणून, सौ. जयश्री पेरणे यांची अंगणवाडी सेविका म्हणून झालेली बढती, सौ. वैष्णवी खाटेकर यांची शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षपदी व सौ. कावेरी निकम यांची सदस्य पदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन खाटेकर होते. प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ यांनी केले. त्यांनी सांगितले की, गेल्या सात-आठ वर्षांपासून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अतूट नाते निर्माण झाले होते. शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना खेद वाटतो, मात्र नव्याने आलेल्या शिक्षकांकडूनही उत्कृष्ट कार्य होईल, अशी अपेक्षा आहे.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, सेवा संस्थेचे सदस्य अविनाश पेरणे, तसेच सत्कार झालेल्या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते शिक्षक व विविध कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला तंटामुक्त समितीचे सदस्य लक्ष्मण पेरणे, सेवा संस्थेचे चेअरमन रेवणनाथ पेरणे, आबासाहेब पेरणे, रघुनाथ हंडाळ, तात्यासाहेब धागुडे, माजी चेअरमन कानिफनाथ धसाळ, भाजपा उपाध्यक्ष अशोक तोडमल, शिवाजी खडके, मच्छिंद्र चव्हाण, शंकर गोपीनाथ पेरणे, अर्जुन धसाळ, स्वप्निल पेरणे, संजय धागुडे, विक्रम तागड, अरुण धसाळ, प्रसाद धागुडे, नितीन निकम, सिद्धार्थ पेरणे, प्रमोद खडके, रावसाहेब खडके, गोरख मोरे, अविनाश पेरणे आदींसह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ यांनी केले.