ॲड. प्रकाश संसारे यांना ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पुणे वेब टिम, ०५ सप्टेबर : लोकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करण्याचे व्रत घेतलेल्या पुणे येथील **ज्ञानमाता सेवाभावी संस्थेतर्फे** दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील **ॲड. प्रकाश संसारे** यांना जाहीर झाला आहे. संस्थेच्या माहिती अधिकार नागरिक समूहातर्फे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष **अब्राहम आढाव** यांच्या सहीने ॲड. संसारे यांना निवडीचे पत्र नुकतेच मिळाले. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, न्यायिक, साहित्यिक, पत्रकारिता आणि माहिती अधिकार यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने गौरव केला जातो. या मान्यवरांच्या यादीत ॲड. संसारे यांचे नाव समाविष्ट झाल्याचा संस्थेला अभिमान आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार आहे. यावेळी ॲड. प्रकाश संसारे यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविले जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *