राहुरी तालुक्यातील वावरथ गावात बिबट्याचा हल्ला; स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),१५ ऑगस्ट : राहुरी तालुक्यातील दुर्गम भागातील वावरथ गावात बिबट्याने हल्ला करून एका शेळीला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. गावातील रेवननाथ गंगाराम सोडनर यांच्या राहत्या घरी गुरुवारी, १४ ऑगस्ट, २०२५ रोजी ही घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची माहिती मिळताच राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब सोडनर यांच्यासह रामदास सोडनर, शरद विटनोर, प्रशांत शेलार, महादेव बाचकर, सतानाना बाचकर, पोपट सोडनर, आणि राहुल सोडनर यांनी घटनास्थळी भेट दिली.

स्थानिक नागरिकांनी वनविभागाला या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *