राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) ,१५ ऑगस्ट : ओ. सी. पी. एम. मिशन कंपाऊंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. आणि सौ. राहुल बापूसाहेब कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये श्रीमती रोहिणी सॅकमन, श्री. राहुल कोरडे, सौ. स्वाती कोरडे, शिरसाट सर, सोनकांबळे सर आणि श्री. नितीन सातभाई यांचा समावेश होता.
पावसाची पर्वा न करता, सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहून राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गायले आणि ध्वजारोहण समारंभ पार पाडला. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनावर सुंदर भाषणे दिली, ज्यातून त्यांच्या भावना आणि विचार दिसून आले.
कार्यक्रमानंतर श्री. राहुल बापूसाहेब कोरडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान मिळाल्याबद्दल श्री. कोरडे यांनी आनंद व्यक्त केला आणि भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी उत्तम काम करत राहण्याची ग्वाही दिली.