राहुरी: गाडगे महाराज आश्रमशाळेचे संचालक तुकाराम धोंडीबा खाडवे यांचा मुलगा गणेश तुकाराम खाडवे याला ॲट्रॉसिटी आणि बाल लैंगिक संरक्षण कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी व शर्तींवर त्याची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
यापूर्वी गणेश खाडवेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर ॲड. करण मुसमाडे आणि ॲड. वैष्णवी सातपुते यांनी दुसरा जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर १८ मे २०२५ रोजी न्यायालयात सुनावणी झाली, ज्यात न्यायालयाने गणेश खाडवेला जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपी गणेश खाडवेच्या वतीने ॲड. करण मुसमाडे आणि ॲड. वैष्णवी सातपुते यांनी बाजू मांडली.