राहुरी वेब प्रतिनिधी, ७ (शरद पाचारणे ) :- आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवांकुर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपरी अवघड गावात काढलेल्या पायी दिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या दिंडी सोहळ्यात श्री विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. पिंपरी गावचे उपसरपंच लहानु बाचकर यांनी दिंडीचे श्रीफळ देऊन आणि पूजा करून स्वागत केले. तसेच, उत्कृष्ट दिंडी सादरीकरणाबद्दल त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले. संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागात असे उपक्रम राबविल्याने आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते.
या दिंडीदरम्यान महाआरती सोहळा, भक्तीगीते, लेझीम पथक आणि वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. डॉ. पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबल यांच्यासह ज्योती शेळके, प्रियंका पांढरे, शितल फाटक, सुजाता तारडे, प्रिया लांबे, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर, सुनीता ढोकणे, मोहिनी पेरणे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, अनिता म्हसे, सोनाली कुमावत आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. शिपाई शारदा तमनर, लता कासवत, वाहतूक विभाग प्रमुख अशोक गाडे, सखाराम बाचकर, अविनाश तनपुरे, नवनाथ गाडे, पिनू आहेर, नंदु गिरी, कैलास गडधे, चौधरी, अनिल गुंजाळ यांच्यासह पिंपरी अवघडचे उपसरपंच लहानु बाचकर, तसेच सुरेशराव लांबे, विजय लांबे, सोमनाथ पवार, जालिंदर पवार, श्यामराव गायकवाड, महेश गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी किरण तारडे यांनी उपस्थित पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले.