तालुक्यातील ज्या ज्या सहकारी संस्था बंद पडल्या आहेत त्या बाजार समितीच्या माध्यमातून सुरु करणार – अरुण तनपुरे 

राहुरी वेब प्रतिनिधी ,१४ ( शरद पाचारणे )- 

बंद पडलेली सूतगिरणी जिनींग प्रेसिंग सुरु करणार असून शेतकऱ्यांच्या कपाशीला योग्य भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असून भविष्यात तालुक्यातील ज्या ज्या सहकारी संस्था बंद पडल्या आहेत त्या बाजार समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात येतील असा विश्वास बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अरुण तनपुरे यांनी आज बोलून दाखवला.

डॉ बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकी पोटी बंद पडलेला पेट्रोल पंप हिंदुस्थान पेट्रोलियमने एका खाजगी व्यक्तीस चालवीण्यास दिला होता तोही बंद पडल्याने त्याची मुदत संपताच हिंदुस्थान पेट्रोलियमने राहुरी बाजार समितीस पंप सुरु करण्यास परवानगी दिल्याने आज राहुरी कारखान्यावरील पेट्रोल पंपाचे उदघाटन बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे होते. यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियमचे रिजनल ऑफिसर विशाल शर्मा व सेल्स ऑफिसर उत्कर्ष वराडे, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब खुळे सर्व आजी माजी संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सभापती अरुण तनपुरे म्हणाले की सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक बाजार समितीने आपल्या आवारात एक पेट्रोल पंप सुरु करण्याच्या सूचना होत्या त्याप्रमाणे बाजार समितीने दोन वर्षांपूर्वी नगर मनमाड राज्य मार्गांवर घेतलेल्या सूतगिरणीच्या जागेवर पेट्रोल पंप सुरु केला त्याचा तालुक्यातील व राज्य मार्गांवरील ग्राहकांना फायदेशीर ठरला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने डॉ तनपुरे कारखान्याचा पंपही आपण चालवीण्यास घ्यावा असे सुचविल्याने आपण हा पंप सुरु करीत आहोत. हा पंप कारखाना मालकीचा असून त्याचे उदघाट्न त्याकाळात कारखान्याचे संस्थापक डॉ बाबुरावदादा तनपुरे यांनी केल्याचा इतिहास आहे कालांतराने सदर पंपाची जागा कमी पडू लागल्याने ह्या पंपाचे नूतनिकरण करून भव्य जागेत माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्यांचे संचालक मंडळाने सुरु केला.या पंपाचा सेल खप वाढविण्याची जबाबदारी यापुढे आपणा सर्वांवर आहे.

अरुण तनपुरे म्हणाले की तालुक्यात ज्या जुन्या संस्था बंद पडलेल्या आहेत त्या त्या उर्जित अवस्थेत आणण्यासाठी राहुरी बाजार समितीचा एक छोटासा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात आज पेट्रोल पंप सुरु करण्यापासून झाली. बंद पडलेली सूतगिरणी सुरु करण्याचा अनेक दिवसाचा माझा मानस होता तो आता लवकरच पूर्ण होऊन बंद पडलेली सूतगिरणी, जिनींग येत्या काही दिवसात निश्चित सुरु केली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला यासाठी बाजार समितीच्या सर्व संचालकांना विश्वास घेऊन हा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळात जरी विरोधी संचालक असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते बरोबर आहे. सूतगिरणीच्या जागेमध्ये लवकरच जनावरांचा बाजार, फळाचे मार्केट सुरु केले जाणार असून तेथील विकास कामे करताना रस्त्याचे कॉक्रि्टीकरण विजेची व्यवस्था सर्व मूलभूत सुविधाही करण्यात आल्या आहे. राहुरी वांबोरी येथील बाजार समितीच्या आवारातील रस्ते पाणी विजेची कामे पूर्ण झाली आहेत.

प्रास्ताविक भाषणात संचालक दत्ता कवाणे म्हणाले की बाते कम काम जादा या म्हणी प्रमाणे अतिशय नियोजन बद्ध काम करण्याऱ्या सभापती अरुण तनपुरे यांनी बाजार समितीने जेव्हा सूतगिरणीची जमीन विकत घेतली तेव्हा पासून त्याचा जो मानस आहे तो बाजार समितीच्या संचालक मंडळा समोर मांडला त्याप्रमाणे मध्यतरी आलेल्या अनेक अडचणीवर मात करून येथे पेट्रोल पंप सुरु केला येत्या १ जूनला याच आवारात जनावरांचा बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला. तसेच अनेक वर्ष बंद पडलेली सूतगिरणी पुन्हा बाजार समितीच्या वतीने सुरु करण्यासाठी त्या जागेचे नूतनिकरण सुरु असून त्यासाठी लागणारी आद्ययवत यंत्र सामुग्रीची ऑर्डर दिली असून बंद पडलेली सूतगिरणी येत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. सभापती तनपुरे यांचे प्रत्येक कामाचे नियोजन असते आज जरी कारखाना निवडणूक लागली असली तरी बाजार समितीच्या कामाकडे त्याचे लक्ष आहे अश्या नेतृत्वावर तालुक्यातील जनतेने बाजार समितीत जसा विश्वास दाखवला तसा आगामी काळात दाखवावा असे दत्ता कवाणे म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले अरुण तनपुरे यांचे नेतृत्वाखाली बाजार समितीच्या कार्याचा संपूर्ण राज्यात नावलौकिक आहे त्यांनी बाजार समितीला सूतगिरणीची जागा घेऊन तिथे पेट्रोल पंप, फळाचा बाजार जनावराच्या बाजाराबरोबर लवकरच सूतगिरणी सुरु करीत आहे हे तालुक्याचे दृष्टीने महत्वाचे आहे आज सूतगिरणीच्या पुढे जाऊन डॉ तनपुरे कारखान्याचा पंप सुरु केला भविष्यात आता शिवाजी महाराजांचा पुतळा ते साखर कारखाना काही दूर नाही ते ही काही अवघड नाही असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी माजी संचालक विजय दौले, सुनील अडसूरे, गंगाधर तमनर, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बाजार समितीचे संचालक सुरेश बाफना, रखमाजी जाधव,गोरक्षनाथ पवार, दत्तात्रय शेळके, मंगेश गाडे, प्रभाकर पानसंबळ ,मधुकर पवार, महेश पानसरे, काशिनाथ काकडे,चंद्रकांत पानंसंबळ, दत्तात्रय आढाव,किसनराव जवरे,ताराचंद तनपुरे,ज्ञानेश्वर कोळसे, रवींद्र आढाव, अरुण ठोकळे, ज्ञानदेव वराळे,माऊली पवार, प्रमोद कदम अरुण ढूस,आबासाहेब वाळुंज, कुंडलिक खपके, अरुण खपके,प्रमोद तारडे,सचिव भिकादास जरे उपसचिव संदीप पावले आदि सह विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.आभार भाऊसाहेब खेवरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *