राहुरी वेब प्रतिनिधी,१४ (शरद पाचारणे)-
याबाबत मिळालेली माहिती अशी की राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील रहिवासी कैलास रामदास कुऱ्हे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा चुलत भाऊ यांच्या घरी कार्यक्रम सुरू होता त्यावेळी ब्राह्मणी येथील सागर ठुबे (पूर्ण नाव माहित नाही ) हा त्याच्या मित्रासोबत काही एक कारण नसताना घराचे समोरून ये – जा करीत होता. बुधवार दिनांक 14 मे 2025 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास सागर ठुबे राहणार ब्राह्मणी हा त्याच्यासोबत अनोळखी पाच इसमाना घेऊन आला त्यावेळी कैलास रामदास कुऱ्हे यांनी त्याला विचारले की तुम्ही सारखे सारखे आमच्या घराचे समोरून ये – जा का करतात असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने सागर ठुबे यांनी त्याच्या हातात तलवार घेऊन कैलास कुऱ्हे यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या जवळ मारून जखमी केले. त्यावेळी सागर ठुबे यांच्यासोबत असलेल्या इतर इसमांनी त्यांच्या हातातील लाकडी काठ्याने व लाथा बुक्क्याने मारहाण केली यावेळी वसंत कुऱ्हे, विठ्ठल कुऱ्हे, विलास कुऱ्हे व सुभाष कुऱ्हे यांनी आरडाओरडा केल्याने ५ इसम हे त्या ठिकाणावरून त्यांच्या मोटरसायकल वरून पळून गेले जखमी झालेले कैलास कुऱ्हे यांनी ११२ नंबर वर कॉल केला त्यानंतर तेथे पोलीस गाडी आली व पोलीस गाडीत बसून पुढे हे राहुरी पोलीस स्टेशनला आले व त्यांनी सागर ठुबे व पाच अनोळखी इसम यांच्या विरोधात राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.