राहुरी वेब प्रतिनिधी,२५ ( शरद पाचारणे )
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ ३८ व्या पदवीदान समारंभ मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला .
या पदवीदान समारंभामध्ये राहुरी तालुक्याचे भूमिपुत्र असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. कैलास संपत पागिरे यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ” कृषी कीटक शास्त्र ” या विषयात डॉक्टर पदवी सह विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल सुवर्णपदक माननीय राज्यपाल श्री . सी . पी . राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल . यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठ प्रति कुलपती ऍडव्होकेट मा.माणिकराव कोकाटे , विधानपरिषदेचे अध्यक्ष मा. ना . श्री . राम शिंदे , नवी दिल्ली कृषी व संशोधन विभागांतर्गत कृषी वैज्ञानिक मंडळाचे अध्यक्ष मा.डॉ . संजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
डॉक्टर पदवी व सुवर्णपदक मिळाल्यनानंतर डॉ. कैलास संपत पागिरे यांनी विद्यापीठाचे आभार मानले.
या पदवीदान समारंभ वेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ . शरद गडाख , राज्यपाल ए . डी . सी . श्री . अभयसिन्हा देशमुख , अधिष्ठाता ( कृषी ) डॉ . साताप्पा खरबडे , विद्यापीठ कार्यकारी परिषदचे सदस्य डॉ . प्रदीप इंगोले , श्री . दत्तात्रय उगले , श्री . संजीव भोर , शिक्षण संचालक डॉ . विठ्ठल शिर्के , विस्तार शिक्षण संचालक डॉ . गोरक्ष सासाणे , कुलसचिव डॉ . नितीन दानवले , कृषी अभियांत्रिकी चे सहयोगी अधिष्ठाता डॉ . रविंद्र बनसोड , नियंत्रक श्री . सदाशिव पाटील आणि विद्यापिठाचे चे उपकुलसचिव श्री . हेमंत सोनार उपस्थित होते .
मूळचे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील भूमिपुत्र असलेले व सध्या अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे कार्यरत असलेले डॉ. कैलास संपत पागिरे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.