राहुरी कारखाना निवडणुकीत राजूभाऊ शेटे यांना सहकार्य करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

राहुरी वेब प्रतिनिधी,१९ (शरद पाचारणे )-

 राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या संदर्भात शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना राहुरी तालुक्याचे नेते राजूभाऊ शेटे यांनी नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख ना. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात सर्व बाबींची तपशीलवार आणि आकडेवारीसह संपूर्ण माहिती देऊन बंद अवस्थेत असलेल्या राहुरी सहकारी साखर कारखान्याची सध्या असलेल्या परिस्थितीचा लेखाजोगा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर मांडली .त्यामध्ये कारखान्यावर असलेले जिल्हा बँकेचे कर्ज, कामगारांची देणी, शैक्षणिक संस्थे संदर्भा बाबतच्या अडचणी व कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे व सभासदांचे उसतोडीसाठी होणारे हाल व त्यामुळे आर्थिक नुकसान तालुक्याची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. त्या साठी राहुरी कारखाना निवडणूक लढवून सभासदांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना चालू करणे किती महत्वाचे आहे. याबाबत राहुरी तालुक्यातील सर्व आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकसंस्थेचा लेखाजोखा मा. उपमुख्यमंत्री यांच्यासमोर राजूभाऊ शेटे पाटील यांनी विस्तृतपणे मांडत मा. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राहुरी कारखाना निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या हितासाठी व शेतकऱ्याच्या बाजूने सदैव खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका स्पष्ट करत कारखाना निवडणुकीसह कारखाना चालू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार व स्वतः म्हणून राजूभाऊ शेटे यांना संपूर्ण मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली व तालुक्यातील शेतकरी व सभासदांसाठी खंबीरपणे मी तुमच्या मागे उभा असल्याचे सांगितले. या भेटीमध्ये कारखान्याच्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करत भविष्यात राज्य सरकारचे सहकारी घेऊन कारखाना पुन्हा उर्जित अवस्थेत आणू असे राजूभाऊ शेटे यांनी सांगितले.

——– 

गेल्या पंधरा वर्षा पासून राहुरी सहकारी साखर कारखाण्याच्या सर्व प्रकारच्या संघर्षात राजूभाऊ यांनी अतिशय मोलाचा सहभाग घेत कारखाण्याच्या असलेल्या लिलाव प्रक्रिया व बँक, कामगार प्रश्री न्यायालयीन लढा लढत सभासद व शेतकरी यांच्या हितासाठी अतिशय तळमळीने व स्व खचर्चाने लढाई लढत आहे. कारखाना हा सभासदांच्या व शेतकऱ्यांच्या मालकीचा राहून तो चांगल्या पद्धतीने उस गाळप करून चालवला गेला पाहिजे या साठी ते सदैव मेहनत घेत असल्याची माहिती शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भाऊ भोर यांनी एक तासाच्या भेटीदरम्यान मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देताच शिंदे यांनी राजूभाऊ शेटे पाटील यांच्या पाठीवर शाबासकी ची थाप देत शेतकऱ्यांसाठी देत असलेल्या लढ्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे बोलले.

…. संजीवजी भोर (राज्य प्रवक्ते शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *