राहुरी वेब प्रतिनिधी,०४ ( शरद पाचारणे ) –
सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून आपली वेगळी ओळख निर्माण केलेले जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये छोटी शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आज राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन आस्थेने विचारपूस केली.
राहुरी विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव कर्डिले हे आमदार असून गेल्या 30 वर्षापासून नेहमी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आमदार म्हणून कर्डिले यांची ओळख आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे ते सध्या हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कर्डिले यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन आस्थेने विचारपूस केली. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सर्वसामान्य लोकांची दैनंदिन कामे तसेच विकासकामे करण्यात आपला हातखंडा असून आता आपण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही दिवस विश्रांती घ्यावी व तब्येतीची काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी फडणवीस यांनी कर्डिले यांना दिला.