राहुरी वेब प्रतिनिधी,०४ ( शरद पाचारणे ) –
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा सन 2025 – 26 या वर्षीचा विकास आराखडा तयार करण्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून सदर जिल्हा परिषद नियोजन समितीच्या सदस्यपदी राहुरी तालुक्यातून आदर्शगाव गणेगावच्या सरपंच सौ. शोभाताई अमोल भनगडे यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषद नियोजन समिती आणि क्षेत्रीय कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली असून सन 2025 – 26 या वर्षाचा जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्याचे काम सदर समिती करणार आहे. विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रगती व त्याकरिता खर्च करण्यात आलेला निधी व पुढील वर्षात यामधील प्रस्तावित उपक्रम व त्याकरीता वाटप करण्यात आलेला निधी याबाबत सदर समिती काम करणार आहे. सदर जिल्हा परिषद नियोजन समितीच्या सदस्य पदी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक सरपंच याप्रमाणे 14 सदस्य समितीमध्ये काम करणार आहेत. गणेगावच्या सरपंच सौ. शोभाताई अमोल भनगडे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.