राहुरी वेब प्रतिनिधी,३१ (शरद पाचारणे )-
राहुरी नगरपरिषद हद्दीतील नगर – मनमाड रोड ते महिपती महाराज चौक कोर्टालगतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे यासाठी माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राहुरी शहराध्यक्ष अक्षय रावसाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहुरी नगरपरिषद हद्दीतील नगर – मनमाड रोड ते महिपती महाराज चौक कोर्टालगतचा रस्त्याचे काम मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मा.आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तांत्रिक मान्यता करून प्रशासकीय मान्यतेसाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे तरी नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी यांनी सदर कामाचा पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून कामाचे टेंडर काढून कामास सुरुवात करावी अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे. या रस्त्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 67, 75, 841 रुपये एवढी आहे.
या निवेदनावर आनंद वाघ, किशोर भुजाडी ,गणेश असुंदेकर ,किशोर भागवत, शेख जिशांन ,पासवान सत्यवान, रितेश लांबे, नितीन दिघ ,योगेश मुसळे, रोहित उंडे ,महेश वराळे, प्रताप भाड ,प्रशांत आव्हाड, दत्तात्रय भुजाडी आदींच्या सह्या आहेत.