राहुरी वेब प्रतिनिधी,२९ ( शरद पाचारणे )-
राहुरी पोलीस ठाणे हद्दीत परमपुज्य श्री. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे दिंडोरी स्वामी समर्थ गुरुपिठ त्रिंबकेश्वर राहुरी फॅक्टरी, राहुरी राष्ट्रीय सत्संग सोहळा श्री. स्वामी समर्थ भक्त मंडळ राहुरी यांनी मुळा सुतगिरणी मैदान राहुरी, अहिल्यानगर येथे दि. ३१/०१/२०२५ रोजी दुपारी ४ वाजता ते रात्री ८ या वेळेत परमपूज्य श्री. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे दिंडोरी स्वामी समर्थ गुरुपिठ त्रिंबकेश्वर हे उपस्थित राहुन सत्संग (प्रवचन) कार्यक्रम करणार आहेत. कार्यक्रमास ५० ते ६० हजार भाविक भक्तगण सत्संग स्थळी उपस्थित राहाणेची शक्यता आहे. सदर कार्यक्रम हा अहिल्यानगर मनमाड महामार्गालगत असुन कार्यक्रमाकरीता येणारे भक्तगणांमुळे सदर महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अहिल्यानगर मनमाड महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असुन सदर महामार्गावरील वाहनाचा कार्यक्रमाकरीता आलेले भाविकांना धक्का लागुन, अपघात होवुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता दिनांक ३१/०१/२०२५ रोजीचे १४.०० वा. ते रात्री २२.०० वा. पावेतो अहिल्यानगर मनमाड महामार्गावरुन जाणारी सर्व प्रकारची जड वाहतुक, बस व इतर वाहतुक यांच्या मार्गामध्ये खालील प्रमाणे बदल केलेले आहे.
१) अहिल्यानगर कडुन राहुरी मार्गे शिर्डी / मनमाडकडे जाणारे अवजड वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग
• अहिल्यानगर -विळदबायपास-दुधडेअरी चौक-शेंडी बायपास-नेवासा-श्रीरामपुर -बाभळेश्वर मार्गे
२) अहिल्यानगर कडुन राहुरी मार्गे शिर्डी / मनमाडकडे जाणारे हलके वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग
• शिंगणापुर फाटा-सोनई-घोडेगाव-नेवासा-श्रीरामपुर-बाभळेश्वर मार्गे
मनमाड / शिर्डीकडुन राहुरी मार्गे अहिल्यानगरकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीचा मार्ग
• मनमाड / शिर्डी-बाभळेश्वर-श्रीरामपुर-नेवासा-मार्ग अहिल्यानगर
प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, सत्संग कार्यक्रमास जाणारे भाविकांची वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही. उपरोक्त आदेशचे पालन करुन नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अवाहन केले आहे.