कामावर उशिरा आल्याचा जाब विचारणाऱ्या वयोवृद्ध मालकिणीचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेपेची शिक्षा

बेलवंडी वेब टिम –
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील ताराबाई काशिनाथ चंदन वय ७२ वर्ष यांचा खून करणारा आरोपी मयूर संजय भागवत वय २५ वर्षे राहणार शिवाजीनगर अहिल्यानगर याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयाने भारतीय दंड विधानसभेचा कलम ३०२ अन्वये दोषी धरत जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील पुष्पक कापसे (गायके) यांनी पाहिले .
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील चंदन यांचा त्यांचं घरा नजीकच मूर्तीचा कारखाना आहे, तेथे काम करणारे मूर्तिकार शेजारी असलेल्या रूम मध्येच राहत होता. दिनांक ३०-०३-२०२३ रोजी सायंकाळी ५: ३० वाजेच्या सुमारास आरोपी मयूर भागवत हा कारखाना येथे कामास आला असता त्यावेळी मयत ताराबाई चंदन या आरोपीला म्हणाल्या की तू कामावर उशिरा का आला अशी विचारणा केली त्यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला, त्या वादा दरम्यान आरोपीने वृद्ध महिला ताराबाई यांना तुम्हाला बघून घेईन असे दम देऊन ते राहत असलेल्या रूममध्ये निघून गेला त्याच दिवशी मयत ताराबाई व तिचे पती हे कारखान्यामध्ये झोपलेले असताना रात्री ११:३० वाजेच्या सुमारास मयत ताराबाईचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिचा मुलगा व सून यांनी त्यांच्या घरातून कारखान्यात येऊन पाहिले असता ताराबाई या रक्तबंबाळहून खाली पडलेल्या होत्या व तिचे शेजारी आरोपी मयूर संजय भागवत हातातील रक्ताने माखलेला चाकू घेऊन उभा होता त्या दोघांना पाहून हातातील चाकू टाकून आरोपी मयूर संजय भागवत हा पळून गेला त्यावेळी जखमी ताराबाई यांना उपचार कामी अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आल, तसेच याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न केल्या बाबत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी आकाश चंदन व गौरव पुरी यांनी आरोपीचा कोळगाव बस स्टॅन्ड येथे शोध घेतला असता तो तेथे मिळून आला व त्यास घेऊन ते पुन्हा घटनेच्या ठिकाणी आले सदर बाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीस चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले दरम्यानच्या काळात जखमी महिला ताराबाई हिला औषध उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहिता कलम 302 अन्वये वाढ करण्यात आली. सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन बेलवंडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चाटे ,लेखनिक हवालदार भांडवलकर रामदास, कैलास शिपणकर यांनी केला. सदर खटला दरम्यान पैरवी अधिकारी सुजाता गायकवाड यांनी सहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *