राहुरी वेब प्रतिनिधी,२८ ( शरद पाचारणे )-
राहुरी स्टेशन येथील इंडिया बायबल चर्च फेलोशीप ट्रस्ट अंतर्गत “कृपा वृध्दाश्रम” या संस्थेचा चौथा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा युवा जिल्हाध्यक्ष अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, संस्थेच्या संचालिका श्रीमती रोहिणी सॅकमन, राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष पत्रकार विनीत धसाळ, डॉ.जयंत कुलकर्णी, प्रिन्सिपल मोहनीराज होन, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.रेणुका रुपटक्के, जेष्ठ पत्रकार वसंतराव झावरे सर, राजू आढाव, माजी उपसरपंच इंद्रभान पेरणे, रामराव पेरणे, ग्रा.पं. सदस्या सौ.स्वाती धसाळ, सौ.अश्विनी चव्हाण, सोसायटी सदस्य अविनाश पेरणे, ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे, तलाठी शरद गिते, व्यवस्थापक किरण गायकवाड, संतोष पवार आदींसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रा.पं.सदस्या सौ. स्वाती विनीत धसाळ यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.