राहुरी वेब प्रतिनिधी,०४ ( शरद पाचारणे ) – केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह पाटील हे शनिवार दिनांक गुरुवार दिनांक २ जानेवारी रोजी अहिल्यानगर दौऱ्यावर असताना राहुरी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राहुरी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले ) तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले ) तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार गुच्छ देऊन पेढे भरून त्यांचं स्वागत सत्कार केला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह पाटील यांना तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे यांनी पेढा भरवून त्यांचे स्वागत केले
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे ,पप्पू महानुभव, जॉन साळवे, आकाश मेहत्रे, संतोष दाभाडे ,राहुल गडगुळे, करण साळवे, राजू बागुल, काळे पाटील, आप्पासाहेब खाजेकर, सलमान सय्यद अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.