राहुरी वेब प्रतिनिधी,०४ ( शरद पाचारणे ) – थोर समाजसेविका भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या “दिव्यांगनिर्णय” दिनदर्शिकेचे प्रकाशन गाडगेबाबा आश्रम शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन खर्चे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दवनगाव शाखाध्यक्ष नानासाहेब खपके हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. दिव्यांग निर्णय दिनदर्शिकाचा उद्देश समाजातील दिव्यांग या घटकापर्यंत दिव्यांग निर्णय दिनदर्शिका पोहचावी म्हणजे त्यावर दिव्यांग संस्थेचे उपक्रम तसेच ध्येय उद्दिष्ट दिव्यांगाचे योजना ची माहिती छापलेली आहे तसेच सर्वसाधारण तालुक्यामध्ये २५ शाखा आहेत. प्रत्येक दिव्यांगाची अडचणी प्रश्न सोडवण्याचे काम शाखेच्या माध्यमातून होत असते राहुरी तालुक्यातील एकही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी ही संस्था काम करते. गजानन खर्चे यांनी ही मनोगत व्यक्त केले दिव्यांग शक्ति सेवा संस्था ही राहुरी तालुक्यातील दिव्यांगा साठी एक वरदान ठरलेली आहे. माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना चांगला फायदा होत आहे या उपक्रमासाठी एक हजार एक रुपयाची देणगी संस्थेच्या उपक्रमासाठी आली.तसेच कोंढवड शाखाध्यक्ष विजय म्हसे यांनी मनोगतात . दिव्यांग शक्ती संस्थेचे उपक्रम माणुसकीची भिंत, चला घर बांधूया दिव्यांगाचे, चला व्यावसायिक बनवूया, चला चूल पेटवूया दिव्यांगाची, फराळ वाटप,दिव्यांग उपयोगी साहित्य वाटप,कार्यक्रम वेगवेगळ्या शिबिरा मार्फत शासनाच्या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचायचं काम संस्था करत असते असी माहिती सांगितली राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे यांनी अनुमोदन दिले राहुरी तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी यांनी उपस्थित यांचे आभार मानले तसेच संस्थेच्या वतीने गजानन खर्चे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले तसेच नानासाहेब खपके यांना शाखाध्यक्ष पाराजी भोसले शाखाउध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार सलीमभाई शेख, राहुरी तालुका संघटक भास्करराव दरंदले शहर कार्याध्यक्ष संजय देवरे राहुरी शहरअध्यक्ष जुबेर मुसानी तालुका कार्याध्यक्ष सुरेश दानवे माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव माहेगाव शाखाउपअध्यक्ष जगन्नाथ हापसे, चेडगाव उपाध्यक्ष बाळासाहेब तरवडे, देवळाली प्रवरा शहर सचिव सुखदेव किर्तने ,राहुरी तालुका मुक बधीर संघटना वेणूनाथ आहेर, कनगर शाखा उपाध्यक्ष रवींद्र दिवे दरडगाव थडी शाखाध्यक्ष बाळासाहेब गांडळ शिलेगाव शाखा अध्यक्ष चंद्रकांत रेबडे आदि उपस्थित होते.