राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे ) –
राहुरी नगरपालिका नागरिकांना नागरी सुविधा देत नसल्यास बाबत माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांनी राहुरीचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन दिलेले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की राहुरी शहरात सध्या एकूण नागरी सुविधा नगरपालिकेकडून कोणत्याही स्वरूपात पूर्तता केली जात नाही. शहरात सगळ्या वार्डांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे काही भागात अजूनही मध्यरात्री पहाटे अडीच व सव्वाचार वाजता नागरिकांना एवढ्या कडाक्याच्या थंडीत उठून पाणी भरावे लागते या वेळेला पाणी येते का नाही याची शाश्वती नसते असे नागरिकांकडून सांगितले जात आहे .कोणत्याच भागात पाण्याची निश्चित वेळ नाही, नागरिक खूप नाराज आहेत तसेच नवीन पाणी योजनेत पूर्वी 90 एचपी पंप ऐवजी 180 एचपी पंप बसूनही पाणीपुरवठा पूर्ण दाबाने मिळत नाही. पूर्वी 90 एचपी पंपाने पाणीपुरवठा साठी अंदाजे तीन लाख लाईट बिल येत होते परंतु सध्या लाईट बिल अंदाजे आठ लाख रुपये येते तरीही वाड्या वस्त्यांना दिवसाआड पाणी सोडले जात आहे. मग नवीन 29 कोटीच्या योजनेत दिवसाआड पाणीपुरवठा करणे हे योग्य आहे का या सर्व बाबी प्रशासकाने दखल घेऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. कचरा उचलणे बाबतीत कारवाई जलद गतीने करावी अन्यथा उपोषण करू असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब राधुजी तनपुरे उर्फ आर.आर तनपुरे ,नारायण धोंगडे ,अक्षय रावसाहेब तनपुरे, दिनेश उंडे, सत्यवान पासवान ,योगेश मुसळे, महेश वारुळे ,भाऊ बर्डे आदींच्या सह्या आहेत.