राहुरी वेब प्रतिनिधी –
सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत त्यातच राहुरी व पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून आमदार प्राजक तनपुरे यांना पाठिंबा दिला आमदार प्राजक तनपुरे यांच्याकडे इन्कमिंग सुरूच असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
12 नोव्हेंबर रोजी दिवसभर राहुरी मतदार संघातील डिग्रस ,खडांबे बुद्रुक,धारवाडी ता.पाथर्डी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या उपस्तिथीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला
डिग्रस येथील प्रवेश – सोसायटीचे सदस्य राहुल भिंगारदे तसेच दिग्रस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेंद्र आघाव यांनी आज आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी उपसरपंच रावसाहेब पवार ,पंचायत समितीचे मा. सदस्य सचिन भिंगारदे, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर पवार , ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे,ललित घुले, राजू कसबे, सौ. प्रतिभा कोकाटे ,सुभाष बेलेकर, संदीप गावडे ,प्रवीण भिंगारदे ,विष्णू बर्डे ,अनिल पवार, सौ. वैशाली टेके आदी उपस्थित होते.
खडांबे बुद्रुक येथील माजी सरपंच यशवंत (मुन्नाशेठ) ताकटे तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा आज आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षात प्रवेश यावेळी सदस्य राहुल पवार रोहित पवार किरण कलापुरे आधार पठाण यांनी प्रवेश केला यावेळी उपस्थित कार्यकर्ते सरपंच कैलास पवार विलास कलापुरे बाळासाहेब जठार बाळासाहेब लटके आदिनाथ धाकटे आदी उपस्थित होते.
धारवाडी ता.पाथर्डी येथील माजी सरपंच युवा नेते बापूसाहेब गोरे व नवनाथ रणसिंग यांनी आमदार प्राजक्त दादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी धारवाडी चे सरपंच भीमराज सोनवणे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, युवा नेते राजेंद्र दगडखैर, राजेंद्र गर्जे आदी उपस्थित होते.