सामाजिक कार्यकर्तेविजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश

राहुरी वेब प्रतिनिधी-

राहुरी शहर व तालुक्यातील अनेक युवकांनी सामाजिक कार्यकर्ते विजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले यांनी सांगितले की भाजपामध्ये राहुरी नगर पाथर्डी मतदार संघामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असून राहुरी येथील विरोधी पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना कधीही मानपान देत नाहीत. अडचणीच्या काळात गरज असताना फोन उचलत नाही त्यामुळे शहर व तालुक्यातील अनेक गावांमधील युवक वर्ग तनपुरे यांच्या वागणुकीमुळे नाराज आहे त्यापैकी आज पर्यंत अनेक युवकांनी मोठ्या संख्येने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे आज प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे आम्ही स्वागत करत असून युवकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय वाघ यांच्यासह बाला साबळे, योगेश पवार, राहुल पारखे, मोहिनिराज दौंड,आकाश साबळे, सोनु साबळे,शुभम मकासरे,गौरव पवार, पारस पवार, किरण दगडे, श्रीकांत शेडगे, सोमेश पाटोळे,अविनाश पाटोळे, संदीप पवार, शिवम कापुरे, युवराज बर्डे, रवी बर्डे, दिपक पवार, अजय पवार, विजय पवार, स्वप्नील पवार, संकेत गायकवाड, रुपेश साबळे, अविनाश साळवे, देवेंद्र सोनवणे, साहिल शिरसाठ आदींनी भाजप मध्ये प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *