राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे ) –
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांची पायाखालची वाळू घसरली असून आता ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष असल्याने प्रचार दरम्यान खाजगीमध्ये अनेक तरुणांना ते जिल्हा बँकेत नोकरीला लावून देतो असे खोटे आमिष दाखवत आहेत. मात्र तरुणांनी कर्डिलेंच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी केले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवाजीराव कर्डिले हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. जिल्हा बँकेमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाले असून नोकर भरतीमध्ये देखील मोठा घोटाळा असल्याचा संशय असुन निवडणुकीच्या तोंडावर ते तरुणांना नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवत आहेत. मात्र यात कुठलीही सत्यता नसुन तरुणांनी कर्डिले यांच्या आमिषाला अजिबात बळी पडू नये असे त्यांनी म्हटले आहे.