राहुरी वेब प्रतिनिधी –
फ्लेक्स बोर्ड फाडले तरी आता राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना निवडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामूळे जनमत बदलणार नाही, विरोधकांनी पातळी सोडू नये असा इशारा भाजपा विधानसभा मतदारसंघाचे संयोजक अमोल भनगडे यांनी दिला आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराचा सोनगाव सात्रळ परीसरात फ्लेक्स बोर्ड अज्ञातांनी फाडला या घटनेचा निषेध व्यक्त करताना संयोजक अमोल भनगडे यांनी सांगितले की, राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवाजीराव कर्डिले यांना सर्वसामान्य जनतेचा व मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनतेमध्ये यांनाच निवडून देण्याचे मत तयार झालेले आहे. त्यामुळे काही अज्ञात विरोधक यांना हे सहन होत नसल्याने अशा प्रकारे पातळी सोडून फ्लेक्स बोर्ड फाडण्याचा प्रकार सुरू झाला आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांना प्रचार करणेचा अधिकार आहे, परंतु संबंधित अज्ञातांची पायाखालची जमीन घसरल्याने असे प्रकार सुरू झाले आहेत परंतु असे बोर्ड फाडले तरी आता जनमत बदलणार नाही संबंधित घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून संबंधितावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे असे भनगडे यांनी सांगितले.