घातक शस्त्रासह गांजा बाळगणाऱ्या आरोपीच्या राहुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

राहुरी वेब प्रतिनिधी,१ (शरद पाचारणे )-

गुरुवार दिनांक३१ ऑक्टोबर, रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की ब्राह्मणी परिसरात एक इसम घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करविताना फिरत आहे अशी बातमी मिळाली होती सदर नमूद बातमीची हकीगत गुन्हे शोध पथकास देऊन तात्काळ नमूद ठिकाणी रवाना केले असता सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये नमूद इसम नामे इस्माईल रफिक शेख वय. 43 रा. बनकर वस्ती ब्राम्हणी ता. राहुरी हा बेकायदेशीर रित्या त्याचे ताब्यामध्ये 780 ग्राम वजनाचा 12200 रुपये किमतीचा गांजा व मोपेड एम. एच. 17 सि. वाय.9353 कब्जात बाळगताना मिळून आला आहे. सदर ठिकाणी नायब तहसीलदार संध्या दळवी मॅडम आणि दोन पंचां समक्ष पंचनामा केला असून त्यास राहुरी पोस्टे येथे आणून पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल बबन यादव यांनी त्याचे विरुध्ध फिर्याद नोंदवली असून त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोस्टे एन. डी. पी. एस कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत खोंडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड,राहुल यादव , प्रमोद ढाकणे , सतीश कुराडे, नदीम शेख, अंकुश भोसले,गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्यानगर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *