राहुरी वेब प्रतिनिधी,२४ (शरद पाचारणे ) –
दिनांक 23/10/2024, रोजी रात्रीच्या वेळी ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की १८ एकर परिसरात एक इसम घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करीत फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर नमूद बातमीची हकीगत गुन्हे शोध पथकास देऊन तात्काळ नमूद ठिकाणी रवाना केले असता सदर ठिकाणी टाकलेल्या छापामध्ये इसम नामे शशिकांत सुखदेव बर्डे वय २९ वर्ष रा. बारगाव नांदूर
जि. अहिल्यानगर हा बेकायदेशीर रित्या लोखंडी पाते असलेले तीस लाकडी मुठ असलेली कत्ती कब्जात बाळगताना मिळून आला आहे त्यास राहुरी पोस्टे येथे आणून पोलीस कॉन्स्टेबल ५२८/प्रमोद सुखदेव ढाकणे यांनी फिर्याद नोंदवली असून त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोस्टे येथे आर्म ऍक्ट कलम 4,25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड,राहुल यादव , प्रमोद ढाकणे , सतीश कुराडे, नदीम शेख, अंकुश भोसले,गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्यानगर यांनी केलेली आहे.