धनराज गाडे व भास्करराव गाडे यांच्या भाजप प्रवेशाने आ.प्राजक्त तनपुरे यांना धक्का

लोणी वेब प्रतिनिधी ,२३ –
स्व.शिवाजीराजे गाडे पाटील यांचे चिरंजीव,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बारागाव नांदूर गटाचे माजी जि.प.सदस्य धनराज गाडे पाटील व सात्रळ गटाचे माजी जि.प.सदस्य भास्करराव गाडे यांनी आज लोणी येथे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन मोठ्या नेत्यांचा प्रवेश झाल्याने आ.प्राजक्त तनपुरे यांना धक्का बसला असून राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे भगदाड पडलेचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *