घुले पाटील महाविद्यालयात महीलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र संपन्न

राहुरी वेब प्रतिनिधी,०१ ( शरद पाचारणे )-
सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी बोल्हेगाव फाटा अहमदनगर येथे घुले पाटील महाविद्यालयात महीलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र पार पडले.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, जिल्हा केंद्र अहमदनगर व मारूतरावजी घुले पाटील महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ॲड. स्वाती पाटील( वाघ) ह्यांनी अतिशय किचकट वाटणारी POSH ,POSCO सारखे कायदे अतिशय सोप्या व सहज भाषेत सांगितले, विवाह नोंदणी किती महत्वाची व गरजेची आहे. त्याचबरोबर कौटुंबिक अत्याचार जर होत असेल तर तो सहन ही नाही करायचा आणि Domestic voilence सारख्या कायद्याचा दुरूपयोग ही नाही करायचा. त्याचबरोबर महिलांचे हक्क व अधिकार वेगवेगळे असून कायद्याला न घाबरतां कायद्याचा योग्य वापर करावा याचे मार्गदर्शन त्यांनी केले.या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, जिल्हा केंद्र अहमदनगरचे सचिव मा. भाऊसाहेब सावंत, घुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॅां ए. के. पदंरकर, मुंबईवरून आलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभाग समन्वयक पल्लवी वाघ, यशस्विनी समन्वयक निलम परदेशी, भारती बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *