राहुरी वेब प्रतिनिधी,०१ ( शरद पाचारणे )-
दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास चिंचोली गावाच्या शिवारात फिर्यादी सुनील पोपट खिलारी राहणार कुरणवाडी तालुका राहुरी यांना तीन आरोपींनी वीट व लाकडी दांड्याने मारहाण करून बळजबरीने दोन लाख रुपये रोख व एक लाख रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व पस्तीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतल्या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी किरण उर्फ सारंगधर तुकाराम जांभुळकर वय 26 वर्ष राहणार वडनेर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर व अभिषेक सटवाजी कोळसे वय 20 राहणार गडदे आखाडा तालुका राहुरी हे गाव सोडून फरार असल्याने त्यांचा शोध राहुरी पोलीस घेत होते . सदर आरोपीय राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत आल्याचे गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ त्यांच्या पथकाला सांगून एक ऑक्टोबर 2024 रोजी आरोपींना अटक करून राहुरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ.सविता गांधले यांनी बाजू मांडून आरोपींना ४ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत .